नोकरीच्या शेवटच्या दिवशी ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले. त्यामुळे ट्रम्प यांचे अकाऊंट काही वेळासाठी पूर्णपणे बंद पडले होते. शेवटी कर्मचाऱ्यांच्या खोडकरपणामुळे ट्विटरवर माफी मागायची वेळ आली.गुरूवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हँडल अस्तित्त्वात नसल्याचे अनेकांच्या लक्षात आलं. अमेरिकेसारख्या महासत्तेचे नेतृत्त्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचं हँडल बंद करण्याचे धाडस कोणी केलं? असा प्रश्न सगळ्यांनाचं पडला. सुरूवातीला हे अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज अनेकांनी बांधला. पण नंतर मात्र ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने खोडकरपणा केल्याचं लक्षात आलं. ट्विटरनं जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews